शेगाव तीन तर खामगावात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

buldana Shegaon three and Khamgaon two corona positive patients
buldana Shegaon three and Khamgaon two corona positive patients

खामगाव (जि.बुलडाणा) :  बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आज पंधरा झाला आहे. वाढते रुग्ण जिल्हा वासियांच्या चिंतेत भर घालणारे आहेत. घाटाखालील शेगाव  शहरात आतापर्यंत तीन तर खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन रुग्णआढळून आल्याने नागरिकांनी आता अधीक जागरूक राहण्याची व काळजी घेण्याची गरज आहे

8 एप्रिल 2020 पर्यंत 96 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 10 नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली.  एकूण 86 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 16  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 102 नागरिक आहेत.

आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 24 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगाव 1 व बुलडाणा 10 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 57 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 95 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 24 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14, शेगांव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.

आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या नमुना मधून 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत ही आकडेवारी बुलढाणा जिल्ह्याची चिंता वाढविणारी आहे. नागपूर प्रयोग शाळेत पाठवलेल्या नमुन्यांपैकी 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेत आल्या नंतर दिलासादायक बातमी हाती आली होती. मात्र उशिरा रात्री आणखी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि पुन्हा चिंतेत भर पडली. यात दोन शेगाव तर एक खामगाव  तालुक्यातील चितोडा येथील आहे.  शेगाव शहरात आता 3 तर खामगाव  तालुक्यातील चितोडा येथे 2 रुग्ण झाले आहेत.

असे आहेत तालुकानिहाय रुग्ण
बुलडाणा - 5 (मृत - 1) 
चिखली - 3,
शेगाव - 3  
खामगाव ( चितोडा) - 2
देऊळगाव राजा - 1 
सिदंखेडराजा- 1

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com