एसटी संप: प्रवाशांचे हाल; बुलढाणा जिल्ह्यात ५०० बसेस उभ्या 

संजय सोनोन  
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला

शेगाव - वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला सोमवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. ऐन सणासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ५०० बसेस उभ्या आहेत. विविध एसटी कामगार संघटनांनी या संपाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

शेगाव शहरातील बस आगारातून एकही एसटी बस स्थानकाच्या फलाटावर लागलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या ठेवण्यात आल्या आहे. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

आगारात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. बसस्थानक व आगारांमध्ये वाहनांचे नुकसान होऊ नये, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व एसटी आगार व स्थानकांमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे चित्रि‌‌करणही करण्यात येत आहे.

Web Title: buldana strike: st strike diwali