
Buldhana Crime Boyfriend Stabs Girlfriend Then Kills Himself
Esakal
बुलढाण्यातील खामगाव इथं एका हॉटेलमध्ये तरुण तरुणीचा बंद खोलीत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. हॉटेल जुगनूमध्ये एका खोलीत तरुण-तरुणी दुपारपासून थांबले होते. तरुणाने आधी प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:वर वार करत आत्महत्या केली. खामगाव शहरातल्या ह़टेल जुगनूमध्ये ही घटना घडली.