Buldhana Crime : मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी चार वर्षे कारावास!

मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
 Court Order
Court Order esakal

बुलडाणा - एका मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बुलडाणा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी हा निकाल दिला.

प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील पळसखेड येथील मतिमंद मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. नातेवाईक मरण पावल्याने आईला बाहेरगावी जावे लागले. त्यावेळी मतिमंद पीडीता मुलगी ही घरी एकटीच होती. ती पायवाटेने बाहेर जात असताना गावातील नितीन प्रेमसिंग राठोड हा तिच्या मागे गेला व तिचा हात धरून तिला नेऊ लागला. यावेळी तिने आरोपीला झटका देऊन ती पळून आली. पिडीतेने घडलेली घटना तिच्या काकूला सांगितली व दुसऱ्या दिवशी आई परत आल्यानंतर आईजवळ सांगितली.

यावरून मुलीच्या आईने 3 ऑगस्ट 2020 रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावेळी पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुनील रामराव दौड यांनी आरोपी विरुद्ध पुरावा आढळल्याने दोषारोपपत्र बुलडाणा जिल्ह्यात दाखल केले. सदर प्रकरण विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांच्याकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी सोपविण्यात आले.

या प्रकरणांमध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले. सदर मुलगी मतिमंद असल्याची जाणीव आरोपीला असतानाही त्याने तिचा विनयभंग केला.

ही बाब न्यायालयाला पटवून दिली व साक्षीपुरावांच्या आधारे गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायाधीशांनी उपरोक्त निकाल दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड संतोष खत्री यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरकर व बंगाळे यांनी त्यांना सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com