Father kills twin daughters in forest
esakal
चिखली ( बुलढाणा ) : अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या हातांनी बाळांना जपायचं होतं, त्याच हातांनी त्यांच्या जीवावर उठून पित्याने राक्षसाचं रूप धारण केलं. अंढेरा-अंचरवाडीदरम्यानच्या दाट जंगलात दोन जुळ्या मुलींचे कुजलेले मृतदेह सापडल्याने परिसरात शोक आणि संतापाचं वातावरण आहे. या दोन्ही मुलींची हत्या बापाने केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.