esakal | बुलढाणा : चोरी व घरफोडीतील टोळी जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या जाळ्यात

बुलढाणा : चोरी व घरफोडीतील टोळी जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोताळा : बोराखेडी पोलिसांनी वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नेमून चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी येथील कैलास नंदलाल झंवर यांच्या किराणा दुकानासमोरून खाद्यतेलाची एक बॅरल लंपास झाली होती. त्यानंतर मो. नासिर मो. मन्सूर यांच्या किराणा दुकानासमोरून खाद्यतेलाच्या तीन बॅरल चोरी झाल्या होत्या. तर, रवींद्र धोंडू पाटील यांच्या निवासस्थानी १४ हजार रुपयांची घरफोडी झाली होती. या तिन्ही प्रकरणात आरोपी अफसर शाह हैदर शाह (२३), शेख इम्रान शेख सलीम (२६, दोघे रा. मोताळा), शेख रेहान उर्फ रिझवान शेख बुडन (२४), इरफान शाह उर्फ काल्या अताउल्लाह शाह (२१, दोघे रा. पांढरी प्लॉट, मलकापूर) या चौघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केली व न्यायालयाच्या आदेशाने पोलिस कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा: देशाच्या केंद्रस्थानी होणार मोठा फ्रिडम पार्क, 'या' ऐतिहासिक वस्तूंचा समावेश

त्यानंतर आरोपी आसिफ खान महेमुद खान (२१, रा. मलकापूर) याला अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. खाद्यतेलाच्या चार बॅरल (किंमत ८९ हजार ६०० रुपये) व दोन्ही गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी (किंमत एक लाख २० हजार रुपये) आणि आरोपी शेख रेहान उर्फ रिझवान व शेख इम्रान यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील रोख १४ हजार रुपये असा एकूण दोन लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर तपासात ठाणेदार राजेंद्र पाटील, एपीआय राहुल जंजाळ, पीएसआय अशोक रोकडे व अनिल भुसारी, एएसआय यशवंत तायडे, पोहेकाँ नंदकिशोर धांडे, नापोकाँ विनोद नरोटे, विजय पैठणे, दीपक पवार, सुनील जाधव, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर धामोडे, गणेश बरडे, गणेश वाघ, चालक शरद खर्चे व शेख आबिद यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

गोपनीय माहिती व सायबर पो.स्टे.ची मदत

मोताळा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला होता. दरम्यान, ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथक नेमून तपासाला गती दिली. या पथकाने गोपनीय माहिती व सायबर पो.स्टे.ची मदत घेऊन चोरट्यांचा छडा लावला. त्यांची कसून चौकशी करून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

loading image
go to top