बार काउंसिल निवडणुकीची रणधुमाळी

devendra-fadnavis
devendra-fadnavis

खामगाव (बुलडाणा) : चार प्रदेशांचा मतदार संघ, एक लाख मतदार, १६४ उमेदवार आणि वर्तमानपत्राच्या आकाराची मतपत्रिका अशी आगळी वेगळी निवडणूक येत्या २५ मार्च रोजी होणार आहे. बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, वकील मंडळी न्यायालयीन कामकाजा सोबतच निवडणूक प्रचारात व्यस्त आल्याचे दिसून येते.

दर पाच वर्षांनी बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संस्थेची निवडणूक होत असते. येत्या २५ मार्चला ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदार संघ हा महाराष्ट्र, गोवा आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिव, दमण या चार प्रदेशाचा आहे. ९५ हजार ३७८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात सर्वाधिक १७ हजार २९४  मतदार मुंबईत असून त्या खालोखाल ९७२२ मतदार पुण्यात आहेत. 

एलएलबीची पदवी घेतल्या नंतर कोर्टात वकिली करण्यासाठी लागणारी सनद ही बार काउंसिल देत असते. बार कौन्सिलवर २५ सदस्य निवडून दिले जणार असून, ते आपला एक अध्यक्ष निवडतील. प्रत्येक मतदारास किमान २५ मते पसंतीक्रमानुसार द्यावी लागणार असून, ५ पेक्षा कमी मते दिल्यास मतदान अवैध ठरणार आहे. १६४ उमेदवार निवडणूक लढवीत असल्याने मतपत्रिका आकाराने वर्तमानपत्रा एवढी असेल. गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी सुरू असुन, आता मतदान जवळ आल्याने वकिलांच्या या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे.

तीन महिने मतमोजणी
उमेदवार आणि मतदार जास्त असल्याने मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीला बरेच दिवस लागतात. मागील निवडणूक सुद्धा रंगातदार झाली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीची मतमोजणी ३ महीने चालली असे ऍड रमेश भट्टड यानी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा मतदार
बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या मतदार यादीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मतदार आहेत. त्यांचे मतदान मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री सुध्दा या निवडणूक प्रक्रियेत मतदान करणार असून, त्यांचे मत मिळविण्यासाठी उमेदवारात चुरस पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com