पीक जगविण्याच्या प्रयत्नात गमवावा लागला जीव

विरेंद्रसिंग राजपूत
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वाडी (ता. नांदुरा) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नाही त्यामुळे पिके कोमजून गेली आहेत. या पिकांना कसे तरी जगविता यावे. यासाठी येथील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे टँकरने पाणी इतर ठिकाणावरून आणून पिके जगवित आहे. येथील पुरुषोत्तम शेलकर यांनीही हाच फॉर्म्युला वापरून आपला ड्रायव्हर विजय पुंजाजी खोडके यास गावाशेजारील महाळुंगी शिवारातील सुधाकर तायडे यांच्या नदीशेजारील विहिरीवर आपले ट्रॅक्टर टँकरसह पाठविले.

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने शेतकऱ्यांना आपले पीक जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पाणी आहे अशा शेतकऱ्यांच्या विहिरीतून टँकरद्वारे पाणी आणून पिकाला जीवदान द्यावे लागत आहे. मात्र या पिकाला जीवदान देण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमविण्याची पाळी वाडी येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर विजय खोडके यांच्यावर आली आहे. 

याबाबत सविस्तर असे की, वाडी (ता. नांदुरा) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नाही त्यामुळे पिके कोमजून गेली आहेत. या पिकांना कसे तरी जगविता यावे. यासाठी येथील शेतकरी ट्रॅक्टरद्वारे टँकरने पाणी इतर ठिकाणावरून आणून पिके जगवित आहे. येथील पुरुषोत्तम शेलकर यांनीही हाच फॉर्म्युला वापरून आपला ड्रायव्हर विजय पुंजाजी खोडके यास गावाशेजारील महाळुंगी शिवारातील सुधाकर तायडे यांच्या नदीशेजारील विहिरीवर आपले ट्रॅक्टर टँकरसह पाठविले. तेथे टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू असताना मोटारीचे काही पाणी खाली गेले हे पाणी एका साईडला पडल्याने टँकरचे एक चाक खचले व शेजारील नदीत हे टँकर पलटी झाले. सोबत ट्रॅक्टरही पलटी होत असल्याचे ड्राइवर विजय खोडके यांच्या लक्षात येताच त्यांनी उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने त्यांचा नाइलाज झाला. एका पाठोपाठ ट्रॅक्टर व टँकरने तीन पलटी खाल्ल्या. यात विजय खोडके हे ट्रॅक्टरखाली दबले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत दूर उभे असलेले ट्रॅक्टर मालक यांनी हा प्रकार पहिला व त्यांना तेथेच भुरळ आली. त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले.एकंदरीत कोमेजलेली पिके जगविण्याच्या प्रयत्नात मात्र विजयला आपला जीव गमविवा लागल्याने वाडी गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Buldhana news farmer dead