एकाच बालकाला मिळाले वेगवेगळ्या नंबरचे दोन आधारकार्ड

विरेंद्रसिंग राजपूत 
बुधवार, 12 जुलै 2017

विशेष म्हणजे ऑनलाईन आधारकार्ड एकदाच काढले असताना आधारकार्डच्या फोटोतही बदल झाल्याचे दिसून येत आहे.

नांदुरा : तालुक्यातील शेम्बा येथील श्रेयस सुमंत पाटील या 2 वर्षीय बालकाला नुकतेच वेगवेगळ्या 2 अलगअलग  नंबरचे आधारकार्ड मिळाले असुन यातील नेमका कोणता आधार नंबर येणाऱ्या काळात उपयोगात आणावा. याबाबत खुद्द पालकलाच प्रश्न पडला आहे.

सध्या आधारकार्ड हे महत्वाचे दस्तवेज असल्याने व आधारावरच सर्व लिंक होत असल्याने या कार्डला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आजच संगणकीय युगात ऑनलाईनच्या छोट्यामोठ्या चुकीतून किती नुकसान होऊ शकते हे यातून दिसून येते.

श्रेयस पाटील या बालकाच्या एका आधारकार्ड वर 623585137680 तर दुसऱ्या आधारकार्डचा नंबर 265382422739 हा आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन आधारकार्ड एकदाच काढले असताना आधारकार्डच्या फोटोतही बदल झाल्याचे दिसून येत आहे. एकाच व्यक्तीचे असे दोन दोन नंबरचे आधारकार्ड निघत असतील तर येणाऱ्या काळात आधारलिंकिंग करून फायदा तरी कसा होईल.हा प्रश्न यातून नक्कीच पडत आहे.

Web Title: buldhana news nandura child gets two aadhar cards

टॅग्स