पावसाअभावी पिके करपली;जनावरांवर चाराटंचाईचे संकट

विरेंद्रसिंग राजपूत
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

नांदुरा तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असून येथील पर्जन्यमान फार कमी आहे. भौगोलिक क्षेत्रफळानुसार ५०३६७ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून या तालुक्यात कपाशी,मका,सोयाबीन ही मुख्य पिके असून तूर, उडीद, मूग या पिकाची पण बऱ्यापैकी पेरणी दरवर्षी केल्या जाते. यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने पेरणीला सुरुवात झाली होती. मात्र अनेक भागात पावसाने धरसोड केल्याने काहींना दुबार पेरणी करावी लागली होती.

नांदुरा (बुलडाणा) : गेल्या अनेक दिवसांपासून नांदुरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील मका, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तूर पीक करपून गेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.

जनावरांनाही सध्या काहीच खायला नाही. यासाठी शासनाने या भागाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

नांदुरा तालुका हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असून येथील पर्जन्यमान फार कमी आहे. भौगोलिक क्षेत्रफळानुसार ५०३६७ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून या तालुक्यात कपाशी,मका,सोयाबीन ही मुख्य पिके असून तूर, उडीद, मूग या पिकाची पण बऱ्यापैकी पेरणी दरवर्षी केल्या जाते. यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने पेरणीला सुरुवात झाली होती. मात्र अनेक भागात पावसाने धरसोड केल्याने काहींना दुबार पेरणी करावी लागली होती. तर काही भाग कसातरी रिमझिम पावसावर पिकांना जीवदान देणारा ठरला होता. मात्र १५ ते २० दिवसांपासून तालुक्यातून पाऊसच गायब झाल्याने सर्व पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. मका व सोयाबीन पिकाचे तर पाऊसही आला तरी उत्पन्नाची हमी संपल्यात जमा आहे. उडीद, मूग तर आठवड्यापुर्वीच करपून गेले आहे. इतर पिकांनाही या पावसाने मारलेल्या लांबलचक दडीचा मोठा विपरीत परिणाम जाणवणार आहे. पावसाची दडी त्यातच उन्हाचे वाढलेले तापमान यामुळे सर्व पिके करपत आहेत. यासाठी शासनाने या भागाचा सर्व्हे करून करपलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दुष्काळ जाहीर करावा व जनावरांसाठी चारा उपलब्ध करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Web Title: Buldhana news no rain nandura