भारिप बहुजन महासंघाच्या मोर्चाला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

खामगाव (बुलडाणा): भारिप बहुजन महासंघाच्या मंगळवारी आयोजित मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता ही परवानगी नाकारण्यात आली.

खामगाव (बुलडाणा): भारिप बहुजन महासंघाच्या मंगळवारी आयोजित मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता ही परवानगी नाकारण्यात आली.

भारिप बहुजन महासंघ तालुका व शहर शाखेच्या वतीने मंगळवारी (ता. ९) खामगाव जिल्हा घोषित करावा यासह विविध मागण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन कार्यात आले होते. या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी भारिपचे नेते अशोक सोनोने यांनी शहर पोलिसांकडे अर्ज सादर करून परवानगी मागितली होती. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जामावबंदी बंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. दरम्यान जमावबंदी आदेश असल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे भरीपचे तालुकाध्यक्ष संघपाल जाधव यांनी सांगितले.

Web Title: buldhana news police the permission was denied to the rally