वानखेड येथील विद्यार्थिनीचा गाझियाबादमध्ये सुवर्ण पदकाने सन्मान

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 10 जानेवारी 2018

संग्रामपूर (बुलढाणा): आदिवासी बहुल जिल्ह्यातील खारपानपटटयातील संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनीला गाझियाबाद येथे सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

संग्रामपूर (बुलढाणा): आदिवासी बहुल जिल्ह्यातील खारपानपटटयातील संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनीला गाझियाबाद येथे सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.

वानखेड येथील रहिवाशी डॉ. शैलेश गांधी याची मुलगी प्राप्ती ही शेगाव येथे संत गजानन महाराज इग्लिश स्कूल मध्ये इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेत आहे. गाझियाबाद मधे नुकत्याच झालेल्या एरोबिक्स प्रतियोगी मध्ये महाराष्ट्राच्या संघात ती सहभागी झाली होती. गाझियाबाद येथे आयोजित 12वी आईएसएएफ  प्रति योगीते मध्ये महाराष्ट्रचा संघ प्रथम, राजस्थान दूसरा तर जम्मू-काश्मीर तीसरे स्थानवर विजयी ठरले. यात प्राप्ती ला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे विजयी संघ या नंतर तालुक्याची प्रतिनिधी म्हणून प्राप्तीकडे पाहले जात आहे.

मे 2018 मधे हे विजेते खेळाडू एशियन गेम मधे थायलंड मध्ये भाग घेणार आहेत. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये विश्व चैंपियन शिप मधे भाग घेणार आहे. या संघामध्ये प्राप्तीचे माध्यमातून तालुक्याचे नाव उज्ज्वल होत आहे. ही बाब तालुका वासियांसाठी आनंदाची ठरणारी आहे.

Web Title: buldhana news prapti gandhi gold award in ghaziabad