गौण खनिजाची अवैध वाहतूक; 3 वाहनधारकांविरुद्ध कारवाई

संजय सोनोने
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तहसीलदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  तलाठी शेख यांनी 3 ब्रास मुरूम  अवैधरित्या वाहतूक करणारा योगेश खोंड यांचा विना नंबर ट्रक पकडला आणि चालक मोहन डाबेराव आणि मालक योगेश खोंड यांना 16 हजार 200 रुपये दंड केला.

शेगाव (जि बूलडाणा) : तालुक्यात अवैधरीत्या रेती व मुरुमाची वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या तीन वाहनधारकांविरुद्ध तहसीलदार गणेश पवार यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

तहसीलदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  तलाठी शेख यांनी 3 ब्रास मुरूम  अवैधरित्या वाहतूक करणारा योगेश खोंड यांचा विना नंबर ट्रक पकडला आणि चालक मोहन डाबेराव आणि मालक योगेश खोंड यांना 16 हजार 200 रुपये दंड केला. तसेच तहसीलदार गणेश पवार यांनी स्वतः नागझरी शिवारातील नदीत एमएच 30 - 2603 क्रमांकाचे ट्रॅक्टर मध्ये रेती घेऊन जात असताना पकडून चालक संदीप वैतकर व मालक शे.मुज्जमिल रा. पारस ता. बाळापूर यांना 15 हजार400 रुपये दंड केला. तर रेतीचे वाहतूक  करणारे दुसरे वाहन एमएच 28 टी-7399 हे ट्रॅक्टर पकडले चालक शे अकबर शे आलम रा.जानोरी याला 15 हजार 400 अशी एकूण 46 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Buldhana news sand mafia in buldhana