निर्दयी सावत्र बापाने चिमुकल्यास चटके देत घेतले चावे

संजय सोनोने
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

चावा घेतल्याच्या शरीरावर ५ खुणा
या क्रूर सावत्र बापाने आपला राग काढताना या निरागस बालकाच्या अंगावर ५ ठिकाणी चावा घेतल्याचे दिसून आले. चावा घेतलेल्या ठिकाणी मोठं-मोठ्या जखमा झालेल्या असून, त्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अंगावरील जखमा पाहून पोलिसांसह डॉक्टरही हादरले. विशेष म्हणजे कपाळापासून तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल 47 खुणाही आढळल्या यात धक्कादायक म्हणजे, आदित्यच्या एका डोळ्यावरही गंभीर दुखापत होती.

शेगाव (बुलडाणा): मुले थोडही दूष्टीआड झाली तर बापाचे जीव सैरभैर होतो. मुलांना चांगले जिवन जगता यावे म्हणून बाप खस्ता खातो, त्यांना वळण लागावे म्हणून प्रसंगी रागवतोही पण त्या रागवण्यात असते काळजी आणि चिंता... मात्र शेगावात असा एक बाप आहे की ज्याला ‘बाप’ म्हणणे म्हणजे बाप या शब्दाचे, भावनेचे अवमुल्यन करणे होय. या निदर्यी बापाने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला चक्क चटके दिले, एवढेच नव्हे तर त्या चिमुकल्याच्या शरीरावर पाच ठिकाणी चावाही घेतल्याचे व्रण त्या निष्पाप जिवाच्या अंगावर आहेत. मोठ मोठया जखमा पाहूनही खंबीरपणे तपास करणारे पोलिसही शेगावातील या निदर्यी बापाचा प्रकार पाहून हादरून गेले, त्यांच्याही डोळयात पाणी आले...खरंच किती हा निर्दयपणा...

पायल बांगर हि महिला मूळची यवतमाळ मधली. पहिल्या पतीकडून एक ३ वर्षीय मुलगा आहे. एक वर्षापूर्वी नवऱ्याने फारकत दिली, म्हणून लहान मुलाला सहारा मिळावा यासाठी पायलने दुसरे लग्न केले. चेतन ढोक असे त्याच्या दुसऱ्या पतीचे नाव.... लग्न करतांना चेतनने पायलच्या आदित्य नावाच्या मुलाचा सांभाळ करण्याच्या शपथाही घेतल्या.... लग्नानंतर काम शोधण्यासाठी चेतन, पत्नी आणि आदित्यला घेऊन शेगावात पोहचला. आणि तेथे एका हॉटेलवर वेटर म्हणून कामाला लागला. मात्र, लग्न होताच चेतन ने आपले असली रूप दाखान्यास सुरुवात केली.... पती-पत्नीच्या वादात 3 वर्षाचा आदित्य हा चेतन ढोक या नराधमाला काटा म्हणून वाटायला लागला. आणि हा काटा काढण्यासाठी चेतन दररोज कुठल्याही कारणाने मारहाण करीत असे. या निर्दयी सावत्र बापाने तीन वर्षीय चिमुकल्यास डासाच्या पेटत्या अगरबत्तीने चटके आणि वेळवेळी अंगावर जनावरांसारखा चावा घेतला. एव्हाड्यावरच न थांबता या क्रूर बापाने डोळा आणि कान फुटेल एव्हडी मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार दररोज सुरु असायचा. दररोज बालकाचे किंचाळणे आणि हृदय हेलावेल असे रडण्यावर सुदामा नगरातील शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी घरात कोंडून ठेवलेल्या या बालकाबद्दल बाल संरक्षण अधिकाऱ्यांना फोन करून सर्व माहिती सांगितली. माहिती मिळताच बाल संरक्षण अधिकारी अविनाश चव्हाण व त्यांच्या पथकाने शेगाव गाठून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी. डी. ढाकणे व शेजारी यांना सोबत घेऊन ढोक याच्या घरात पोहचले असता घरात आदित्य हा दिसला. पोलिस आणि इतर नागरिक पाहताच चिमुकल्या आदित्यने पोलिसांना मिठी मारली. आदित्यच्या अंगावर मोठ मोठया जखमा पाहून खंबीरपणे तपास करणारे पोलिसही शेगावातील या निदर्यी बापाचा प्रकार पाहून हादरून गेले, उपस्थितांसह त्यांच्याही डोळयात पाणी आले...

आदित्यने पोलिसांना पाहून 'मला घेऊन चला अशी आर्त हाक देताच' सर्वांचेच मन हेलावले. पोलिसांनी आई पायल आणि आदित्यला पोलीस स्टेशन मध्ये आणून विचारपूस केली असता चेतन हा दारू पिऊन कुठल्याही कारणाने आपल्यासह आपल्या मुलाला मारायचा असे तिने सांगितले.

पोलिसांनी बालकाचे वैद्यकीय तपासणी केली असून, कपाळापासून तळव्यापर्यंत मारहाणीच्या तब्बल ४७ खुणा आढळल्या, तर चावा घेतल्याच्या शरीरावर ५ खुणा दिसून आल्यात. पोलिसांनी सदर बालकाला आईच्या संमतीने बाल सुधार गृहात पाठविले आहे. कडू असलेल्या या अध्याचा शेवट मात्र गोड झाला. आणि चिमुकल्याचे प्राण वाचले आहे. दुसरीकडे बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन मध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: buldhana news shegaon stepfather child burn crime