
बुलढाण्यात दहावीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकाला ताब्यात घेतलंय. १ जुलै रोजी दुपारी वसाडी बुद्रुक इथं ही घटना घडली. वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यानं शिक्षकाने शारीरिक शिक्षा केली. यामुळे अपमान झाल्यानं विद्यार्थ्यांनं टोकाचं पाऊल उचललं.