बुलडाणा : जिल्ह्यात लाडकी बहीण योजना लाभार्थी पडताळणी दरम्यान, ५१ हजार ४३० लाभार्थी महिलांचा लाभ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदच्या कर्मचारी असलेल्या १९९ बहिणींकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार असून, त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. तसे पत्र आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद येडोले यांच्याकडून सांगण्यात आले.