बुलडाणा : शिवस्मारक प्रणेत्याच्या जपणार स्मृती

स्व.विनायकराव मेटेंच्या आठवणींना दिला सर्वपक्षीय नेत्यांनी उजाळा
Buldhana
Buldhana

बुलडाणा : विनायकराव मेटे व बुलडाणा जिल्हा हे भावनिक ऋणानुबंध होते. मराठा आरक्षणासाठीचा एल्गार त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातीलच संतनगरी शेगाव येथून पुकारला होता. मराठा महासंघाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील येरळीकर त्यांचे मार्गदर्शक होते. जगातील सर्वांत भव्यदिव्य शिवस्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात व्हावे, या संकल्पनेचे ते प्रणेते होते. त्यामुळे या शिवस्मारकाच्या प्रणेत्याच्या स्मृती बुलडाणा शहरात साकार होत असलेल्या भव्य शिवस्मारकात जपण्यात येतील, असे अभिवचन सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी संयुक्तपणे वाहिलेल्या श्रद्धांजली सभेत देण्यात आले.

स्व.विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. बुलडाणा जिल्ह्यात त्यांच्या निधनानिमित्त विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. १९ ऑगस्टला शिवस्मारक समिती बुलडाणाच्या वतीने विनायकराव मेटे यांना सामुहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन कृष्णा हॉटेलच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विनायकराव मेटेंच्या स्मृती जागवतांना त्यांचेशी असलेले कौटुंबिक ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.

आ. संजय गायकवाड यांनी मेटे यांच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा देत, मुंबईतील भव्य शिवस्मारकाची संकल्पना साकारणार्‍या विनायकरावांच्या स्मृती बुलडाण्यात होत असलेल्या शिवस्मारकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या पुढे त्यांचा छोटा पुतळा उभारून जपण्यात येतील, असे अभिवचन दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, विजयराज शिंदे, गोकुल शर्मा, साहेबराव मोरे, शिवस्मारक समिती बुलडाणाचे सचिव डॉ.विकास बाहेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुष्यभर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणार्‍या विनायकराव मेटे यांना शिंदे व फडणवीस सरकारने मराठा आरक्षण मिळवून देणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशा शोकसंवेदना दूरध्वनीद्वारे श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना चिखलीच्या आ.सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केल्या.

याशिवाय बुलडाणा बार असो. अध्यक्ष अ‍ॅड.विजय सावळे, मराठा महासंघाच्या विभागीय अध्यक्षा अनुजा सावळे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ.तेजराव तुपकर, डॉ.दुर्गासिंग जाधव, बलदेवराव चोपडे, राकॉ. चे डी. एस. लहाने, राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, पत्रकार अरुण जैन आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मराठा सेवा संघाचे संजय विखे, अ‍ॅड.जयसिंग देशमुख, सुनील सपकाळ, कुणाल गायकवाड, ओमसिंग राजपूत, राजेश हेलगे, मानकर सर, प्रा.म्हळसणे सर, गोपालसिंग राजपूत, नंदकिशोर पाटील, महादेव शेळके, नरेश शेळके, अरविंद होंडे, अनिल बावस्कर, पद्मनाभ बाहेकर ओमसिंग राजपूत, सचिन परांडे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र काळे यांनी तर आयोजनात तुकाराम अंभोरे पाटील व शिवस्मारक समिती बुलडाणाच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. शेवटी सामुहिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com