भरधाव मेटॅडोरची ट्रकला धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

हिंगणा(जि.नागपूर ) : भरधाव मेटॅडोरने ट्रकला धडक दिल्याने मेटॅडोरचालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 1) सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान हिंगणा-गुमगाव वळणावर घडली. हिंगणा एमआयडीसीतील आदित्य एअर प्रेशर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मेटॅडोर ऑक्‍सिजन सिलिंडर भरून भरधाव हिंगणामार्गे गुमगावकडे जात होता. गुमगाववरून ट्रक हिंगणा शहराकडे येत होता. डाक कार्यालयाजवळील वळणावर भरधाव मेटॅडोरने ट्रकला धडक दिली. या अपघातात मेटॅडोरचालक प्रफुल्ल उइके (29, खैरी पन्नासे) हा गंभीर जखमी झाला. हिंगणा पोलिसांनी तातडीने मेटॅडोरचालकाला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हिंगणा(जि.नागपूर ) : भरधाव मेटॅडोरने ट्रकला धडक दिल्याने मेटॅडोरचालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 1) सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान हिंगणा-गुमगाव वळणावर घडली. हिंगणा एमआयडीसीतील आदित्य एअर प्रेशर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मेटॅडोर ऑक्‍सिजन सिलिंडर भरून भरधाव हिंगणामार्गे गुमगावकडे जात होता. गुमगाववरून ट्रक हिंगणा शहराकडे येत होता. डाक कार्यालयाजवळील वळणावर भरधाव मेटॅडोरने ट्रकला धडक दिली. या अपघातात मेटॅडोरचालक प्रफुल्ल उइके (29, खैरी पन्नासे) हा गंभीर जखमी झाला. हिंगणा पोलिसांनी तातडीने मेटॅडोरचालकाला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी चालकाची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे समजते. मेटॅडोरचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी मेटॅडोरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन कुंभार करीत आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bumped metadore hit the truck