अकोल्यात जाळल्या पाचशे, हजारांच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

अकोला - शहरातील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठितांचा परिसर अशी ओळख असलेल्या सहकारनगरातील विजय हाउसिंग सोसायटीत शनिवारी सकाळी पाचशे, हजारांच्या नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. खदान पोलिसांनी अर्धवट जाळलेल्या पाचशे रुपयांच्या 89 तर हजार रुपयांच्या 17 अशा एकूण 16 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

विजय हाउसिंग सोसायटीतील राजकुमार केडिया यांच्या कारखान्यामागील गल्लीत काडीकचरा जळत असताना तेथे कचरा वेचणारी एक महिला गेली. जळत असलेल्या कचऱ्याच्या आजूबाजूला तिला अर्धवट जाळलेल्या नोटा आढळल्या. तिने त्या नोटा जमा करून परिसरातील नागरिकांना माहिती दिली. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. नागरिकांनी जाळलेल्या नोटा बघण्यासाठी एकच गर्दी केली. खदान पोलिस निरीक्षक गजानन शेळके, सहायक पोलिस निरीक्षक राजू भारसाकळे, पोलिस जमादार तारासिंग राठोड, श्री. पारधी, श्रीराम जाधव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अर्धवट जाळलेल्या पाचशे रुपयांच्या 89 तर हजार रुपयांच्या 17 नोटा अशा एकूण 16 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त करून पंचनामा केला.

जाळलेल्या नोटा खऱ्या आहेत किंवा नकली, याची चौकशी करणार आहोत. त्यानंतर या कोणाच्या नोटा आहेत, याचा तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करणार आहोत. सध्या पंचनामा करून स्टेशन डायरीत नोंद घेत आहोत.
गजानन शेळके, खदान पोलिस निरीक्षक

Web Title: burning five hundred, thousand notes in akola