भाविकांच्या बसला ट्रकची धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर : वणी येथे शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या जैन भाविकांच्या खासगी बसला ट्रकने जबर धडक दिली. यात एक वृद्ध महिला ठार झाली तर 13 जण जखमी झाले. त्यातील 5 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हिवरीनगरात घडला. बिमलादेवी सूरजमली नाहाटा (वय 75, वर्धमानगनर) असे अपघातात ठार झालेल्या भाविक महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक मुनी महाराज यांच्या चातुर्मास प्रवेश शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी स्थानिक जैन बांधव खासगी प्रवासी बसने वणीकडे निघाले होते. वर्धमाननगरातून (सेंट्रल एव्हेन्यू) टेलिफोन एक्‍स्चेंज चौकात बस आली असता अतिशय वेगात आलेल्या ट्रक (एमएच 31/ एपी 4886)ने बसला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बसमधील सर्वच्या सर्व प्रवाशांना दुखापत झाली. त्यातील 13 प्रवासी भाविक जबर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर झालेल्या आरडाओरडामुळे नागरिकांनी गर्दी केली. बसमधील जखमींना नागरिकांनी मदत केली. त्यांना बसमधून बाहेर काढले. दुखापत झालेल्यांनी लगेच आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून अपघाताची माहिती दिली. एका युवकाने नियंत्रण कक्षाला अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लकडगंज पोलिस अपघातस्थळी पोहचले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पोलिसांसह अनेक जैन बांधव मदतीसाठी तिकडे धावले. त्यांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. लकडगंज पोलिसांनी आरोपी ट्रकचालक दिलीप चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bus caught the truck