esakal | बस वाहून गेल्याचे प्रकरण : चालकाचा मृतदेह सापडला; प्रशासनाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बस वाहून गेल्याचे प्रकरण : चालकाचा मृतदेह सापडला

sakal_logo
By
अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ) : नांदेडवरून नागपूरकडे जाणारी एसटी दहागाव नाल्याच्या पुरात मंगळवारी वाहून गेली होती. बुधवारी (ता. २९) सकाळी दहा वाजता ही बस नाल्यातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. बसचालकाचा मृतदेह घटनास्थळापासून दीड किलोमीटर लांब सापडल्याने २६ तासांपासून सुरू असलेले प्रशासनाचे रेस्क्यू ऑपरेशन समाप्त झाले.

नांदेडवरून नागपूरला जाणारी हिरकणी बस दहागाव नाल्यावरून जात असताना पुरात वाहून गेली होती. बसमधील चालक व वाहकासह सहा व्यक्तींपैकी दोघांना वाचविण्यात यश आले. तर उर्वरित चार जणांना जीव गमवावा लागला. बस नाल्यात वाहून जात असताना उभ्या असलेल्या धाडसी युवकांनी सुब्रमण्यम शर्मा व शरद फुलमाळी यांना वाचवले. त्यानंतर सायंकाळपर्यंत बसमध्ये असलेल्या मृतदेहापैकी वाहक भीमराव नागरीकर, प्रवासी शेख सलीम शेख इब्राहिम, इंदल रामप्रसाद मेहत्रे यांचे मृतदेह मंगळवारी बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा: चक्क डॉन सफेलकरच्या बायकोशी मैत्री; अन् घडला थरारक हत्याकांड

परंतु, चालकाचा मृतदेह न सापडल्यामुळे प्रशासनाचे रेस्क्यू ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री अंधार झाल्यामुळे बंद झालेले प्रयत्न परत सकाळी सुरू करण्यात आले. जिल्हा पोलिस आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी सकाळी दहा वाजता बसला क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले. यावेळी चालकाचा मृतदेह बसमध्ये आढळून आला नाही. त्यामुळे परत नाल्यांमधून चालकाचा शोध घेतला असता घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर बंग यांच्या शेताजवळ चालक सतीश सूरेवार यांचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू असलेले प्रशासनाचे प्रयत्न बुधवारी सकाळी दहा वाजता संपले.

मंगलवारी आमदार नामदेव ससाने, अति जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, परिवेक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे, वाहतूक शाखा निरीक्षक खेडेकर, पोलिस निरीक्षक खडसे, तलाठी दत्तात्रय दुकैवार हे प्रयत्नरत होते. महामार्ग पोलिस मदत केंद्र कोसदणी, जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यवतमाळ, पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी यांच्यासह स्थानिक उमरखेड व दहागाव येथील युवकांनी सहकार्य केले.

loading image
go to top