esakal | थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग
sakal

बोलून बातमी शोधा

थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या, वाईट गोष्टी आणि घटना घडत असतात. घटनांकडे कोणत्या नजरेने बघते यावरून त्या व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख ठरविला जातो. त्यामुळे सर्वांची प्रगती होतेच असे नाही. योग्य नियोजन आणि साजेशी मेहनत वेळीच घेतली की रिजल्ट चांगले मिळतात. असे अनेक उदाहरण आहेत की खिशात पैसा नसताना आणि डोळ्यासमोर कोणतेही मार्ग नसताना फक्त ध्येयप्राप्तीने झपाटलेल्या व्यक्तीने आयुष्यात विकासाचा झेंडा फडकविला. अशातील एक व्यक्ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील प्रकाश गोकुळे... (business-idea-Prakash-Gokule-Owner-of-four-industries-Yavatmal-District-News-nad86)

प्रकाश गोकुळे यांच्या आयुष्यातील प्रगतीचा मार्ग खडतर. मात्र, त्यातूनही मार्ग काढून आणि मिळेल त्या संधीवर स्वार होत प्रकाश गोकुळे यांनी एक किंवा दोन नाही तर अनेक क्षेत्रात प्रगतीचा झेंडा रोवला आहे. अफाट इच्छाशक्ती आणि काम करण्याच्या जिद्दीमुळे त्यांनी दारव्हा तालुक्यातील यशस्वी उद्योजकाचा खिताब मिळविला आहे. प्रकाश गोकुळे यांच्या प्रगतीचा आणि उद्योजक होण्यासाठी जे कष्ट उपसले त्याचा मोठा इतिहास आहे.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

प्रकाश हे २००४ मध्ये घराबाहेर पडले. त्यांच्या खिशात केवळ ८० रुपये होते. ८० रुपयात फक्त दोनवेळचे जेवण होणार हे माहीत असतानाही त्यांनी घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. कारण, त्यांच्यासमोर एक ध्येय होते आणि ते त्यांना गाठायचे होते. घराबाहेर पडताना पत्नी त्यांच्यासोबत होती. तो दिवस त्यांच्यासाठी फार हळवा होता. त्यादिवशी घरगुती सामान नेण्यासाठी ४० रुपये गाडी भाडे दिले. उर्वरित पैशात दोघांनी जेवण केले.

यानंतर त्यांनी एक खासगी बॅंकेत कामाला सुरुवात केली. त्यानंतर आरडी जमा करायला लागले. चारचौघांत मिसळणारा त्यांचा स्वभाव आणि लोकांना मदत करण्याची त्यांची चांगली सवय त्यांच्या कामात आली. आरडीचे काम करीत असताना त्यांचा अनेकांशी संपर्क आला. हा संपर्क त्यांना व्यवसाय वाढविण्यास मदत करू लागला. त्या कामातून काही पैसे मिळत गेले. यानंतर प्रकाश गोकुळे हे एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी सरकारच्या विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला. आरडी एजंट नंतर पुढे याच भरवशावर २००४ ला आरटीओ एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली.

२००८ मध्ये त्यांनी शहरात वाहन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेले भांडवल बॅंकेतून घेतले. खऱ्या अर्थाने प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाली. चारचाकी वाहन शिकविता-शिकविता अनेकांशी संबंध आले. या तीन कामाचा व्याप बघता सहकारी कामावर लावला. तिन्ही कामाच्या भरवशावर २०११ ला यवतमाळ अर्बन बॅंकेच्या सहकार्याने शहरात किरायाच्या जागेत दुचाकी विक्रीचे अधिकृत सेल्स ऍण्ड सर्व्हिस सेंटर टाकले. या ठिकाणी अनेकांना रोजगार दिला.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

३० कुटुंबाचे पालनपोषण

८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग असा थक्क करणारा प्रवास युवा उद्योजक प्रकाश गोकुळे यांनी अवघ्या १६ वर्षांत गाठला. या उद्योगातून आतापर्यंत ३० लोकांना रोजगारही दिला आहे. त्यांच्या व्यवसायाची प्रगती होत आहे. ८० रुपये खिशात टाकून घराबाहेर पडलेल्या प्रकाश यांनी व्यवसायात मोठी प्रगती केली. आज त्यांच्यामुळे ३० कुटुंबाचा पालनपोषण होत आहे.

उद्योग भरभराटीस आणण्यासाठी लोकांनी विश्‍वास टाकला. पत्नी संगीता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. माझ्याकडे विविध ठिकाणी ३० कामगार काम करीत असून, त्यांना रोजगार मिळाला आहे.
- प्रकाश गोकुळे, युवा उद्योजक, दारव्हा

(business-idea-Prakash-Gokule-Owner-of-four-industries-Yavatmal-District-News-nad86)

loading image