esakal | मनपाच्या शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

चंद्रपूर : एकीकडे शासकीय मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची ओरड होत असताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगू शाळा प्रगतिपथावर आहेत. कोरोनाच्या काळामध्ये या शाळांनी ऑनलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत नवी क्रांती घडविली आहे. डिजिटल पद्धतीने शिक्षण प्रणाली सुरू केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. (Chandrapur-Municipal-Corporation-School-News-Delhi-pattern-Digital-education-system-nad86)

महानगरपालिकेने आता शाळा अद्ययावत करण्याचे ठरवले आहे. त्यादिशेने पहिले पाऊल महापालिकेने टाकले आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील ही शाळा असून, येथे पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. येथे सेमी इंग्रजी शिकवली जाते. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण २९ शाळा कार्यरत आहेत.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

यामध्ये तीन शाळेमध्ये तेलगू, तीन शाळेत हिंदी, तीन शाळेत उर्दू आणि २१ शाळेत मराठीच्या माध्यमातून शिकविण्यात येते. एकूण सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजी वन, केजी टू आदी शिक्षणसुद्धा दिले जात आहे. सुमारे ८४० विद्यार्थी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पटसंख्या आहे. दहा शाळांच्या माध्यमातून सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू आहे.

२०१६-१७ यावर्षी २,५७१च्या आसपास पटसंख्या होती. ती यंदाच्या शैक्षणिक सत्रात २०२१-२२ मध्ये ३,४५४ इतकी झाली आहे. याचा अर्थ कॉन्व्हेंटमधील विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धत अमलात आणल्याने विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये दुप्पट पटसंख्या झाल्याचे उदाहरण यावर्षी पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मराठी माध्यमाचे ६२ शिक्षक, हिंदी माध्यमाचे पाच शिक्षक, उर्दू माध्यमाचे दोन शिक्षक आणि तेलगू माध्यमातून पाच शिक्षक कार्यरत आहेत.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धत अमलात आणल्याने विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील मनपाच्या मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याचे उदाहरण यावर्षी पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेचे शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे उपक्रम कौतुकास्पद आहेत.
- राखी संजय कंचर्लावार, महापौर

हेही वाचा: गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नीवर दुःखाचा डोंगर

कोरोनाच्या काळातही सर्व नियम पाळून आणि आरोग्याची काळजी घेत मागील वर्षी मनपाच्या शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. शाळा बंद असतानाही विद्यार्थी अभ्यासात मागे पडला नाही. शक्य तिथे ऑनलाइन पद्धतीने आणि जे विद्यार्थी मोबाईल घेऊ शकत नाही, आशांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम शिक्षकांनी केले. त्यामुळे यावर्षी मनपाच्या शाळेत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे.
- राजेश मोहिते, मनपा आयुक्त

(Chandrapur-Municipal-Corporation-School-News-Delhi-pattern-Digital-education-system-nad86)

loading image