राज्यातील उद्योगांना वेगवेगळे वीजदर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

नागपूर - संपूर्ण देशात समान वीजदर असावेत, हा केंद्र शासनाचा मानस आहे. राज्य शासनाने मात्र औद्योगिकदृष्ट्या मागास भागात वेगवेगळ्या दराने सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील उद्योगांना चार वेगवेगळ्या दराने वीजपुरवठा होणार आहे. शासनाच्या निर्णयाने मागास भागात उद्योगांना चालना मिळणार आहे. परंतु, या निर्णयामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

नागपूर - संपूर्ण देशात समान वीजदर असावेत, हा केंद्र शासनाचा मानस आहे. राज्य शासनाने मात्र औद्योगिकदृष्ट्या मागास भागात वेगवेगळ्या दराने सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील उद्योगांना चार वेगवेगळ्या दराने वीजपुरवठा होणार आहे. शासनाच्या निर्णयाने मागास भागात उद्योगांना चालना मिळणार आहे. परंतु, या निर्णयामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या डी आणि डी प्लस झोनमधील उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्याची घोषणा नुकतीच राज्य शासनाने केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी सवलतीचे दर वेगवेगळे आहेत. म्हणजेच राज्यातील उद्योगांना चार वेगवेगळ्या दराने वीज खरेदी करावी लागणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे विदर्भातील उद्योजकांचे 500 कोटी, मराठवाड्यातील उद्योजकांचे चारशे कोटी वाचणार आहेत. नागपूर परिमंडळातील उद्योगांना सुमारे सव्वा कोटीचा लाभ होणार आहे.

औद्योगिक ग्राहकांचे डी आणि डी प्लस झोन तसेच विभागनिहाय विभाजन करून सवलतीच्या दराने बिलाची आकारणी वीजवितरण कंपनीला करावी लागणार आहे. याशिवाय नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्योगांसाठी वेगळे दर राहणार आहेत. ही आकडेमोड प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारी ठरणार असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

इंधन समायोजनातील सवलत
विदर्भ - 40 पैसे प्रतियुनिट
मराठवाडा - 30 पैसे प्रतियुनिट
उत्तर महाराष्ट्र - 20 पैसे प्रतियुनिट

वीज वापराच्या प्रमाणात विदर्भ
एक्‍स्प्रेस फिडर ग्राहक - 30 पैसे ते 1.40 रुपये प्रतियुनिट
नॉन एक्‍स्प्रेस फिडर - 30 पैसे ते 1.20 रुपये प्रतियुनिट
लघुदाब - 30 पैसे ते 90 पैसे प्रतियुनिट

नवीन उद्योगांसाठी आकर्षण
विदर्भ, मराठवाड्यासाठी 75 पैसे प्रतियुनिट सवलत
उत्तर महाराष्ट्रासाठी 50 पैसे प्रतियुनिट

जिल्ह्यातील उद्योगांची स्थिती
नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांची एकूण संख्या 9 हजार 204 आहे. त्यातील जिल्ह्यात 5 हजार 778 ग्राहकांपैकी एक्‍स्प्रेस फिडरवरील ग्राहकसंख्या 89, नॉन एक्‍स्प्रेस फिडरवरील ग्राहकांची संख्या 286 तर उर्वरित लघुदाब ग्राहक आहेत. शहर मंडळात एकूण 3 हजार 426 औद्योगिक ग्राहक असून एक्‍स्प्रेस फिडरवरील ग्राहकसंख्या 22, नॉन एक्‍स्प्रेस फिडरवरील ग्राहकसंख्या 412 उर्वरित 2 हजार 992 लघुदाब औद्योगिक ग्राहक आहेत.

Web Title: Business various Electricity rates in state