दर्यापुरातील डॉ. भट्टड यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

दर्यापूर (जि. अमरावती) : दर्यापुरातील गोदावरी हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल त्यांच्या मित्रांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने इन कॅमेरा शवविच्छेदन केले. दरम्यान, गुरुवारी (ता. 5) पोलिसांनी डॉ. भट्टड यांनी गळफास घेतल्याची पुष्टी केली. मात्र, कारण स्पष्ट केले नाही.

दर्यापुरातील डॉ. भट्टड हे जिल्ह्यात सुपरिचित होते. त्यांची गोदावरी चॅरिटेबल ट्रस्ट, गोदावरी हॉस्पिटल, एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट, गोदावरी नागरी सह पतसंस्था यासह जिल्ह्यातील अनेक उद्योगांमध्ये त्यांचा सहभाग होता. गेल्या महिनाभरापासून डॉ. भट्टड काहीसे एकांगी राहात असल्याचे अनेकांना जाणवत होते. गुरुवारी काल सकाळी 9 वाजता अचानक गोदावरी हॉस्पिटलच्या आयसीयूच्या बाजूला असलेल्या एका खोलीत डॉ. भट्टड मृतावस्थेत आढळले.
त्यांच्या मृत्यूबाबत काहींनी हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. अखेर हा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी शिवसेना, मनसे नेत्यांच्या मागणीनुसार इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू होते. चमूच्या अहवालातून काय स्पष्ट होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in camera postmortam of dr bhattad