Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या प्रतिपत्रावर जुन्या तारखेचाच शिक्का असल्याचे सांगितले जात होते. 

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर; कोण कोण करणार प्रचार?

त्यामुळे डॉ. आशिष देशमुख आणि प्रशांत पवार यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर तहसील कार्यालयात सुनावणी झाली. त्यानंतर हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा अर्ज वैध असल्याचा निर्णय देण्यात आला. 

Vidhan Sabha 2019 : उर्मिला मातोंडकर काँग्रेसचा प्रचार करणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidacy Form of CM Devendra Fadnavis is Valid Vidhan Sabha 2019