उमेदवारांना ऑनलाइन प्रक्रियेचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

गडचिरोली - निवडणूक आयोगाने गेल्या नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र मंगळवारी गर्दीमुळे काम कासवगतीने सुरू होते; यामुळे उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या टप्प्यात उद्या, बुधवारी (ता. १) अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारांची तारांबळ उडणार आहे.

गडचिरोली - निवडणूक आयोगाने गेल्या नगरपालिका, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र मंगळवारी गर्दीमुळे काम कासवगतीने सुरू होते; यामुळे उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या टप्प्यात उद्या, बुधवारी (ता. १) अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारांची तारांबळ उडणार आहे.

तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू केली. उमेदवारीवरून राजकीय पक्षांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने सुरुवातीचे दोन दिवस अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी फारसी उत्सुकता दाखविली नाही. मंगळवारी नेट कॅफेवर एकच गर्दी उसळल्याने त्याचा सेवेवर परिणाम झाला. उमेदवारांची एकच धावपळ झाली.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षात तिकीट वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तिकिटासाठी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावंत तसेच जुन्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांवर प्रचंड दडपण दिसून येत आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे नक्षलग्रस्त भागात असल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करीत निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याचे ठरविले. प्रशासनाने मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे.

दिग्गजांच्या क्षेत्राकडे लक्ष
यंदा आरक्षणामुळे दिग्गजांच्या क्षेत्रात बदल झाल्याने अनेकांना नवीन क्षेत्राचा आधार घ्यावा लागला. गेली पाच वर्षे आपल्या क्षेत्रात विकासकामे करणाऱ्यांनाही याचा धक्का बसल्याचे दिसून येते. नगरपालिकांच्या निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या पक्षात तिकिटासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, डॉ. तामदेव दुधबळे, रवींद्र ओल्लालवार, अतुल गण्यारपवार, अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, छाया कुंभारे, रेखा डोळस आदी दिग्गजांचा निवडणुकीत कस लागणार आहे.

Web Title: Candidates hit the online process