कार प्रकल्प ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जलालखेडा (जि. नागपूर) :  तीन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. नरखेड तालुक्‍यातदेखील हीच परिस्थिती आहे. कार प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील खैरी गावात असला तरी याचे कालवे नरखेड तालुक्‍यात आल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कार प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नरखेड तालुक्‍यातील कड नदी काठच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नरखेड तालुक्‍यात सिंचन प्रकल्प कमीच आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना जाम व कार प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळते. परंतु, या प्रकल्पातून मागील वर्षी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा वाळल्या होत्या. जाम प्रकल्प काहीच प्रमाणात भरला असताना कार प्रकल्प शंभर टक्‍के भरून वाहत आहे. प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
कार प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे नरखेड तालुक्‍यातील कड नदी काठच्या खराशी, गुमगाव, जाटलापूर, लोहारी सावंगा, आरंभी व अन्य गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने दवंडी देऊन सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सुरक्षित स्थळी जाण्याचेदेखील कळवले आहे. नरखेड तालुक्‍यात 24 तासांत 42 मिमी पाऊस पडला असून, आतापर्यंत 487.6 मिमी पाऊस पडला आहे. तालुक्‍यात सरासरी 50 टक्‍के पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, शेतीची कामे खोळंबली आहे. तरी मात्र मागील वर्षी दुष्काळ सोसलेल्या शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car project overflow