esakal | तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं शंका निरसन; शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार 
sakal

बोलून बातमी शोधा

Career guidance to 10th and 12th students in Maharashtra

यासाठी राज्यात 426 तज्ज्ञ समुपदेशक नियुक्‍त करण्यात आले आहेत. यात नागपूर विभागात 34 तज्ज्ञ असून त्यांच्या मदतीला 596 विषय तज्ञांची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकांचे निरसन करणे शक्‍य होणार असल्याची माहिती या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं शंका निरसन; शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : कोरोना काळात शाळा बंद असल्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यासाठी राज्यात 426 तज्ज्ञ समुपदेशक नियुक्‍त करण्यात आले आहेत. यात नागपूर विभागात 34 तज्ज्ञ असून त्यांच्या मदतीला 596 विषय तज्ञांची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकांचे निरसन करणे शक्‍य होणार असल्याची माहिती या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -  रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडून होती तरुणी; काकानं खांद्यावर घेत पायी पार केलं तब्बल ३...

दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी व शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून संवाद साधले जाणार आहे.

जिल्हानिहाय यादी संकेतस्थळावर

जिल्हानिहाय शिक्षकांची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत भीती व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या शिक्षकांची भूमिका राहणार आहे. त्यासाठी तज्ञांच्या संवादातून विद्यार्थ्यांना आपले प्रश्‍न सोडविता येतील. जेणेकरुन विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहे.

हेही वाचा - क्षुल्लक वाद अन् भरचौकात मांडीवर चाकूनं केला वार; वाचून तुमच्याही अंगाचा उडणार थरकाप  

नागपूर विभागातील जिल्हा निहाय तज्ज्ञ समुपदेशक

भंडारा -- 03
गोंदिया -- 05
चंद्रपूर -- 07
गडचिरोली -- 03
नागपूर -- 09
वर्धा -- 07 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image