सावधान! संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर आता कॅमेऱ्याची नजर

kanshivani damera.jpg
kanshivani damera.jpg

कानशिवणी (जि. अकोला) : संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, काही नागरिकांकडून त्याचे पालन केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अखेर पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने त्यांची चित्रफित काढून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिसरात आता विनाकारण फिरणाऱ्यांवर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

उल्लंघन केल्यास होणार कारवाई
अकोला येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जनतेला सतर्कतेचा इशारा देऊन शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु, ग्रामीण भागामध्ये शासनाच्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच अनुषंगाने बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी, पोलिस उपनिरीक्षक संतोष अघाव व विष्णू ढोरे यांच्या संमतीने कानशिवणी येथील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य राजेश वावकार, पोलिस पाटील माणिकराव वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण शिवणकार, तलाठी गावंडे यांच्या देखरेखमध्ये गावातील गजानन मेश्राम यांची तात्पुरती नेमणूक करून गावामध्ये जमावबंदी अथवा विनाकारण फिरणारे तसेच जीवनावश्यक किराणा दुकान, भाजीपाला दुकान वेळेचे उल्लंघन करून उघडे दिसल्यास त्यांचा व्हिडिओ काढून ग्रामपंचायत व पोलिस स्टेशनला पाठवून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. त्यामुळे गरज नसताना फिरणाऱ्यांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com