अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जातपडताणीचा गोंधळ !

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

बारावीच्या निकालानंतर आता आभियांकी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरुन ओबीसी, एससी, एसटीसह इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
 

अकोला - बारावीच्या निकालानंतर आता आभियांकी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरुन ओबीसी, एससी, एसटीसह इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेत गोंधळाची स्थिती असल्याने विद्यार्थी पालकांत संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. बहूतांश विद्यार्थ्यांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नाही वैद्यकीय अभ्यासक्रम आणि अभियांत्रीकी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना ह्या जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

हा प्रकार म्हणजे शैक्षणिक आरक्षण हद्दपार करणारा आणि घटनेच्या अधिकाराचे हणन करणारा ठरत आहे. एकीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 3 महिन्याच्या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्राची माहिती विद्यार्थी अद्ययन करु शकतात असे म्हटले, पण त्याबाबत ऑनलाईन प्रक्रियेत उल्लेख नसल्याने सगळा गोंधळाचा प्रकार आहे. महाविद्यालयांना तशा सूचना शिक्षण विभागांकडून मिळालेल्या नाहीत. तुर्त सॉफ्टवेअर नुसार ज्या विद्यार्थ्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र आहे. त्यांचीच प्रवेशपत्र नोंदणी अंतीम तारीख आहे. 4 दिवसात विद्यार्थी प्रमाणपत्र कसे मिळवणार ? त्यामुळे आरक्षणाचा फायदा द्यायचा नाही असे धोरण सरकारने या संदर्भात ठेवले की काय ? अशी शंका विद्यार्थी आणि पालकांत व्यक्त होत आहे.

या प्रकरणी, त्वरीत दखल घेऊन प्रवेशाची अंतीम तारीख वाढवून द्यावी. जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचा कालावधी 3 महिन्याचा द्यावा व तसे आदेश वेबसाईट आणि महाविद्यालयांना देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

दहावी बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आतापर्यंत विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी सवलत मिळायची. यावर्षी ही सवलत मिळणार नाही असे सांगितले जात असल्याने सर्वांचीच कुचंबणा होत आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी जी यंत्रणा आहे ती अतिशय तोकडी आहे. राजकारण, शिक्षण आणि नोकरी या तीन कारणांसाठी या प्रमाणपत्राची गरज असते. अर्थात मोठ्या प्रमाणात यासाठी गर्दी होत असताना या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढविण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो. नेमकी अडचण समजून घ्यायला अधिकाऱ्यांना वेळ नाही.

आज युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी समोर विद्यार्थ्यांनी नारेबाजी करित आंदोलन केले. नितीन मिश्रा शहरप्रमुख, निखीलसिंग ठाकूर जिल्हा समन्वयक, अभिजित मुळे, जिल्हा सचिव, सागर चव्हाण तालुका प्रमुख, विक्कीसिंग बाबरी, सौरभ 
नागोसे, श्रीकांत मुरुमकार, चेतन मारवाल, अजय दुबे, रणजीत गावंडे, संदिप ताथोड, यांच्यासोबत युवा सेनेचे पादाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Web Title: cast validity problem create in engineering admission process!