वाघाला पकडण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर ः शहराच्या वेशीवर असलेल्या फेटरी, येरला, बोरगाव, माहुरझरी, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा परिसरात वाघ असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे तीन गस्तिपथके नेमली आहेत. सोबतच प्रत्येक गावातून पाच मुलांना प्रशिक्षण दिले.

गेल्या काही दिवसांपासून उपरोक्त गावांमध्ये अनेकांना वाघ दिसला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. विशेष व्याघ्रसंरक्षण दलालाही सक्रिय केले आहे. मात्र, आठ दिवसांपासून वाघाने कुणावर हल्ला केल्याची घटना घडली नाही. अचानक वाघ दिसल्यास प्रत्येक गावातील पाच मुलांना गुरुवारी सेमिनरी हिल येथील हरिसिंग सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. त्यात
आपल्या क्षेत्रात वाघ असल्यास काय काळजी घ्यावी, लोकांनी शेतात कसे काम करावे, स्वतःचा बचाव कसा करावा, याची माहिती देण्यात आली.
सहायक वनसंरक्षक, पेंच व्याघ्रप्रकल्प अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक प्रज्योत पालवे यांनी फिल्म व स्लाइड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनित अरोरा, पराग दांडगे यांनी वन्यजीवांच्या सवयी व अधिवास या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात सुबोध नंदगवळी, पशुवैद्यकीय अधिकारी, विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल खडतकर, वनपाल रामेश्वर पांचाळ, वनरक्षक व सर्व गावचे सरपंच उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To catch a tiger Training local youth