गोवंशाची कातडी वाहून नेणारा टेम्पो पकडला

अनिल दंदी
बुधवार, 25 एप्रिल 2018

गोवंश कत्तलीवर बंदी असतानादेखील खुलेआम मांस विक्री होत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकारी व पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

अकोला : उरळ पोलिसांची हद्द ओलांडून बाळापूर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात गोवंश कातडीची खुलेआम वाहतूक करणारा टेम्पो पारस येथील मुख्य चौकात नागरिकांनी पकडला.

बाळापूर पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे ठाणेदार विनोद ठाकरे यांनी  यावेळी सांगीतले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सदर टेम्पोमध्ये ही कातडी कोठून आली हा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

गोवंश कत्तलीवर बंदी असतानादेखील खुलेआम मांस विक्री होत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकारी व पोलिस यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

निमकर्दा गावाकडून पारसमार्गे बाळापूरकडे जाणारा एम एच 05 आर 6501 या क्रमांकाचा छोटा हत्ती पारस येथील नागरीकांनी आज दुपारी बाराच्या सुमारास थांबविला. त्यामध्ये अंदाजे शंभर कातडी आढळली. विशेष म्हणजे ही कातडी जनावरांच्या अंगावर गरम पाणि टाकून सोलण्यात आली आहे.

नागरिकांनी पारस पोलास चौकीतल्या पोलिसांना बोलावून वाहन पोलासांच्या ताब्यात दिले. हा मुद्देमाल वाहनासह लाखों रुपयांचा आहे. जनावरांच्या कातडी व्यवसायामागे पुष्कळ मोठे जाळे असण्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेवून या अवैध व्यवसायाला चाप लावावा, तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Caught the tempo carriying cows skin

टॅग्स