सीबीएसईच्या परीक्षा नऊ मार्चपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नागपूर - नऊ मार्चपासून देशभरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. दरवर्षी एक मार्चपासून सीबीएसईच्या परीक्षा सुरू होतात. मात्र, यावर्षी पाच राज्यांतील निवडणुका असल्यानेच परीक्षा लांबल्या आहेत. 

सीबीएसईद्वारे दहावीची परीक्षा नऊ मार्च ते दहा एप्रिलपर्यंत चालेल. यात 3 हजार 974 परीक्षा केंद्रावर देशभरातून 16 लाख 67 हजार 573 विद्यार्थी सहभागी होतील. यासाठी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास एक लाख 76 हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली. बारावीची परीक्षा नऊ मार्च ते 24 एप्रिलपर्यंत चालेल. यात 3500 परीक्षा केंद्रावर 10 लाख 98 हजार 420 विद्यार्थी बसतील. यावर्षी बारावीतही 33 हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. शहरात तीस शाळांमधून दहावीच्या परीक्षेत साडेचार हजारांवर विद्यार्थी तर बारावीत 20 शाळांमधून 1 हजार विद्यार्थी परीक्षा देतील.

Web Title: CBSE exams from nine in March