सिलींग फॅन अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू 

अनिल कांबळे 
मंगळवार, 8 मे 2018

छताला लटकवलेला सुरू असलेल्या फॅनची कडी तुटल्याने फॅन चिमुकलीच्या अंगावर पडला. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली.

नागपूर - झोपेत असलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीच्या अंगावर फिरता सिलींग फॅन पडला. या अपघातात चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. नेत्रा गणेश वाडेकर असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. 

गणेश वाडेकर हे खरबीतील न्यू डायमंड नगरात राहतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगी झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुलीला जमीनीवर झोपवून आई काम करीत होती. दरम्यान छताला लटकवलेला सुरू असलेल्या फॅनची कडी तुटल्याने फॅन चिमुकलीच्या अंगावर पडला. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली. प्रकार लक्षात येताच चिमुकलीला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तासाभरात चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: ceiling fan fell on a Little girl and she dies in nagpur

टॅग्स