रावण पूजनाने दसरा उत्सव साजरा

मनोहर बोरकर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा येथील सामाजिक गोटूल भवन प्रांगनात आदिवासींचे कुल दैवत महाबली राजे रावण महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसभा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांचे हस्ते करून दसरा उत्सव साजरा करण्यात आला. गेली चार वर्षापासून रावण दहन करण्यास विरोध करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन रावण पुजेचा कार्यक्रम तालुक्यातील आदिवासी समाजाकडून घेतला जात असून रावण राक्षस नसुन अदिवासींचे कुलदैवत असल्याची भावना दृढ होतांना दिसून येत आहे.

यावेळी महाधिराज रावण महाराज हे आदिवासी समाजाचे आदर्श राजे होते. ते अत्यंत बुद्धिवान व बलशालीही होते. त्यांचे राज्य काळात आदिवासी समाज वैचारिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संपन्न होता. आता मात्र आदिवासी समाज अज्ञान व मागासलेपणाच्या गर्देत गेला आहे. यासाठी कुलदैवतांचे वैचारिक धोरण स्वीकार केल्याशिवाय सामाजिक प्रगती करणे अवघड असून ज्ञान तथा सामाजिक उत्क्रांतीची आवश्यकता असल्याचे सैनु गोटा यांनी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समिति सदस्य शिला गोटा होत्या, प्रस्ताविक लक्ष्मण नवडी यांनी, सुत्रसंचालन मंगेश नरोटे केले तर आभार प्रशांत गोटा यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
 
Web Title: Celebrate the Dasara festival by worshiping Ravana