विधी महाविद्यालयात 'ग्रीन डे'  साजरा

अनिल कांबळे
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर : 'सकाळ ग्रीन डे' संपूर्ण शहरात साजरा करण्यात आला. शहरातील गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालय नंदनवन येथे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्नेहल फडणवीस यांच्या हस्ते वृक्षपूजा करून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी डॉ. अर्चना सुके, डॉ. दीप्ती खुबाळकर, डॉ. रोहिणी फुलाडी डॉ. दीपक तायवाडे, डॉ. लीना लंगडे, डॉ. नंदिनी गायकवाड, प्रा. पुष्पा देवतळे, प्रा. अर्चना कडू-राऊत, प्रा. शाखा बागडे इत्यादी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी सविता जगताप जाधव, नितीन देशभ्रतार,  सुबोध जुमळे, शारीन हुसेन,  दीपमाला शर्मा, दिव्या, देवयानी निमजे या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

'ग्रीन डे' सकाळचा स्तुत्य उपक्रम असून वृक्षारोपण हि काळाची गरज आहे. वसुंधरेला हिरवा शालू घालण्यासाठी सकाळने सकारात्मक उपक्रम राबविला आहे. 

- डॉ. स्नेहल फडणवीस, प्राचार्य,  वंजारी विधी महाविद्यालय न्यू नंदनवन.

Web Title: Celebrated 'Green Day' in Law College