सिमेंट उद्योगांना मंदीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

चंद्रपूर : अर्थव्यवस्थेतील मरगळीचा देशभरातील वेगवेगळ्या उद्योगांना फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट उद्योगही यापासून बचावले नाही. घुग्घुस येथील एसीसी सिमेंट कंपनीचे उत्पादन मागणी नसल्याने पंधरा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे एसीसी कंपनीचे जवळपास शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अल्ट्राटेक, अंबुजा आणि माणिकगड सिमेंट कंपनीचीसुद्धा कमीअधिक फरकाने हीच अवस्था आहे. एसीसी सिमेंट कंपनीत दररोज सात हजार टन सिमेंटचे उत्पादन होते. 12 हजार टन सिमेंट दररोज बाहेर पाठविले जाते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून सिमेंटला मागणीच नाही. बांधकाम क्षेत्रातील मरगळीमुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. त्यामुळे जवळपास चार लाख सिमेंट बॅग भरल्या जातील (दोन लाख टन) एवढे "सीलो' (यापासून सिमेंट तयार केले जाते) कंपनीत पडून आहे. कंपनीचे गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र, सिमेंटला मागणी नाही. त्यामुळे उत्पादन थांबविण्याचा निर्णय एसीसीने घेतला आहे. गत 15 दिवसांपासून उत्पादन ठप्प आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cement industry faces a downturn