Vidhan Sabha 2019 : केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू आज विदर्भात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती : केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू उर्वरित महाराष्ट्राचा आढावा घेऊन उद्या, शनिवारी विदर्भात दाखल होत आहे. अमरावती, गडचिरोली आणि नागपूर येथे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या चमूतर्फे घेतला जाईल. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेची खातरजमा याप्रसंगी केली जाण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेवसिंग यांचा चमूत समावेश आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे त्यांच्यासोबत राहतील. औरंगाबाद, नाशिक येथे आज, शुक्रवारी आढावा घेऊन ही चमू उद्या, शनिवारी सकाळी 9 वाजता हेलिकॉप्टरने बेलोरा विमानतळ (अमरावती) येथे येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलिस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, विभागातील पाचही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अमरावती जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता निवडणूकविषयक आढावा बैठक घेतली जाईल. चमूतर्फे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी व उपाययोजनेचा आढावा यावेळी यंत्रणेकडून घेतला जाईल. पश्‍चात ही चमू हेलिकॉप्टरने रवाना होऊन नक्षलग्रस्त गडचिरोली व त्यानंतर नागपूर विभागाची बैठक घेईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Election Commission team in Vidarbha today