Central Railway Traffic Block Affects Mumbai-Pune Route
esakal
नागपूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विशेष ट्राफिक ब्लॉकमुळे शनिवारी (ता.१३) नागपूर-पुणे एक्सप्रेस आणि १४ जूनची परतीची पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकचा मुंबई मार्गावरील अनेक गाड्यांवर वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.