निवडणूक सुव्यवस्थेसाठी अमरावतीत केंद्रीय सुरक्षा दल दाखल

Central security forces enter Amravati
Central security forces enter Amravati

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी.आय.एस.एफ.), रेल्वे पोलिस फोर्स (आर.पी.एफ) यासह मध्यप्रेदशातून मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि होमगार्ड जिल्ह्यात दाखल होत आहे. 
जिल्ह्यात शहरातील व ग्रामीण भागातील स्थानिक पोलिसांनीच केंद्राकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती. त्यापैकी सीआयएसएफ, आरपीएफच्या कंपन्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गुरुवारी (ता. 17) अमरावतीत पोचल्या. मध्यप्रदेशातून जिल्ह्यासाठी एक हजारच्या आसपास गृहरक्षक दलाचे जवान सुद्धा शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी पोहोचले आहे. शनिवारी (ता. 19) सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार सुरू राहणार असल्याने जेवढे संख्याबळ शहर व ग्रामीण भागात बाहेरून अमरावतीत दाखल झाले त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. हे संपूर्ण संख्याबळ काही पोलिस ठाणे तर, उर्वरित कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुख्यालयात आणि ठाण्याच्या ठिकाणी राखीव ठेवले जाईल. संबंधित मतदारसंघात ज्या ठिकाणी आवश्‍यकता भासेल तेथे हे राखीव सुरक्षा दल पाठविण्यात येईल. जवळपास नव्वद टक्के ग्रामीण व शहर पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवाय स्थानिक पोलिसांच्या मदतीला याच जिल्ह्यातील होमगार्ड (पुरुष/महिला) यांनाही बंदोबस्तासाठी तैनात करण्याचे आदेश मिळाले आहेत. 
दोन दिवस कडक तपासणी 
आज, शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जिल्हा, आंतरराज्य सीमेवर तपासणी मोहीम पूर्वीपेक्षाही अधिक कडक करण्याचे आदेश तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com