सीईओ यांनी काढला अफलातून निर्देश, वाचा काय आहे? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

यावर्षी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव नागपूर तालुक्‍यातील गोटाड पांजरी येथील एस. एस. इंटरनॅशनल स्कूल येथे 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात जवळपास दोन हजार पाचशे विद्यार्थी व तीनशे शिक्षक सहभागी होणार आहेत. मात्र, प्रशासनाकडून काटकसर म्हणून रात्रीच्या भोजन आणि पांघरूणाची व्यवस्था विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. 

नागपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू व शिक्षकांनी स्पर्धेच्या अगोदरचा एक दिवस अगोदर म्हणजे रात्री स्पर्धा स्थळी पोहोचायचे आहे. मात्र, रात्रीची शिदोरी व पुरेसे अंथरूण, पांघरूण सोबत घेऊन यावे असा अजब आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे. सीईओंच्या या आदेशामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला असून, पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. तालुकास्तरावर विजयी ठरलेल्या चमू जिल्हास्तरावर आयोजित या महोत्सवात सहभागी होतात. इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी अनुक्रमे कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटांत ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी या सांघिक खेळांसह काही वैयक्तिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा होत असतात. 

सविस्तर वाचा - किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌...

यावर्षी या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव नागपूर तालुक्‍यातील गोटाड पांजरी येथील एस. एस. इंटरनॅशनल स्कूल येथे 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात जवळपास दोन हजार पाचशे विद्यार्थी व तीनशे शिक्षक सहभागी होणार आहेत. दरवर्षी या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाते. मात्र, यावर्षी प्रशासनाकडून काटकसर म्हणून रात्रीच्या भोजन आणि पांघरूणाची व्यवस्था विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. 

क्लिक करा - पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल

विद्यार्थ्यांची गैरसोय

स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांचे संघ सहभागी होणार असून, तालुकास्तरावर विजयी ठरलेले हे संघ तालुक्‍यातील विविध शाळांमधील असणार आहेत. तेरा तालुक्‍यांतील दूरच्या गावातून येणाऱ्या खेळाडूंना सकाळीच निघावे लागणार आहे. त्यावेळी रात्रीची शिदोरी घेऊन निघणे त्यांना सोयीचे ठरणारे नाही. सकाळची ही शिदोरी रात्रीपर्यंत खराब होण्याची शक्‍यता असल्याने खेळाडूंची प्रकृती बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आयोजकांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ceo says, Bring a lunch box