एका सोहळ्यात दोनच डी. लिट., डी. एससी.

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर : नवीन विद्यापीठ कायद्याने डी.लिट., डी.एससीच्या प्रक्रियेवर बऱ्याच प्रमाणात संशोधन केल्याचे दिसते. त्यातूनच आता एका दीक्षान्त सोहळ्यात दोनपेक्षा अधिक डी.लिट. वा डी.एससी. प्रदान करता येणार आहे. तसेच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना देण्यात येणारी मानद "डी.लिट.' पदवी बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. लवकरच या विषयावर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मागील काळात पीएच.डी. मिळविणाऱ्यांचे मोठे पीक आले होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात कठोर नियमावली तयार केली. त्याचा परिणाम म्हणून विद्यापीठातील पीएच.डी.धारकांची संख्या काहीशी कमी झाली. येत्या काळात दीक्षान्त सोहळ्यात पीएच.डी.धारकांची संख्या कमी दिसून येईल. पीएच.डी. प्रमाणे डी.लिट. आणि डी.एससी. करणाऱ्या संशोधनकांचीही संख्या वाढत आहे. विद्यापीठात 25 ते 30 संशोधकांनी डी.लिट. आणि डी.एससी. शोधप्रबंध सादर केले आहेत. असे असताना आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार डी.लिट. आणि डी.एससी. या पदव्या देण्यासंदर्भात नव्या तरतुदींचा समावेश केला आहे. त्यामुळे डी.लिट., डी.एससी.वर बंधने येण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे केवळ समाजात काहीतरी विशेष कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींना विद्यापीठाकडून मानद डी.लिट., डी.एससी. या पदवीने गौरविण्यात येत होते. मात्र, ही पदवी देण्यावरही कायद्याने बंधन घातल्याने पदवी बंद करण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. त्यामुळे संशोधनातून दोनपेक्षा अधिक लोकांनी डी.लिट., डी.एससीसाठी अर्ज केल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन नियमावली तयार केली जाणार असल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले.

Web Title: At a ceremony, only two. Lit., d. SC

टॅग्स