चंद्रपुरात पारा 46.8 अंशांवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून, चंद्रपुरात पाऱ्याने या मोसमातील 46.8 अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक नोंदविला. ब्रह्मपुरी येथे 46.5, तर नागपुरात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हामुळे विदर्भात दोन महिलांनाही जीव गमवावा लागला. उन्हाचे चटके आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

मे च्या पूर्वार्धात ऊन-पावसाचा खेळ चालल्यानंतर उत्तरार्ध चांगलाच तापू लागलाय. उन्हाच्या लाटेचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांना बसतो आहे. चंद्रपूरकरांनी आज या मोसमातील सर्वांत "हॉट संडे' अनुभवला. येथे रविवारी नोंदविण्यात आलेले 46.8 अंश सेल्सिअस तापमान या मोसमातील सर्वाधिक ठरले. ब्रह्मपुरीवासीही उन्हामुळे प्रचंड त्रस्त आहेत. येथे कमाल 46.5 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाच्या शर्यतीत नागपूरही मागे नाही. येथे पारा 45.5 अंशांवर होता. याशिवाय वर्धा (45.5 अंश सेल्सिअस), गोंदिया (44.3 अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (43.5 अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे तीव्रतेने चटके जाणवले. उन्हाच्या लाटेमुळे उष्माघातासारख्या जीवघेण्या आजारांनी डोके वर काढले असून, रविवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन महिलांचे प्राणही घेतले. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आणखी काही दिवस उन्हाचा प्रभाव कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये 

नागपूर 45.5 
अकोला 43.6 
अमरावती 41.8 
बुलडाणा 40.0 
ब्रह्मपुरी 46.5 
चंद्रपूर 46.8 
गोंदिया 44.3 
वर्धा 45.5 
यवतमाळ 43.5 

Web Title: chandrapur @ 46.8