चंद्रपूर @ 47.6 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - ढगाळ वातावरणामुळे खाली आलेला पारा गुरुवारी पुन्हा विक्रमी झेपावला. चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाने या मोसमातील नवा उच्चांक गाठला. विदर्भात उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. 

पाऊस व ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात घट झाली होती. मात्र, गुरुवारी अचानक उन्हाचा तडाखा वाढला. लाटेचा सर्वाधिक प्रभाव पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या दोन जिल्ह्यांना बसला. चंद्रपूर येथे पारा चोवीस तासांत तब्बल अडीच अंशांनी चढून विक्रमी 47.6 अंशांवर झेपावला. येथे नोंद झालेले कमाल तापमान विदर्भासह राज्यातही सर्वाधिक ठरले. गेल्या अकरा मे रोजी येथे पारा 47.3 अंशांवर गेला होता. ब्रह्मपुरीतही या मोसमातील 46.7 अंशांचा उच्चांक नोंदला गेला. याआधी अकरा मे रोजीही 46.7 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. नागपूर येथे पाराही किंचित चढून 44.7 अंशांवर स्थिरावला. विदर्भातील उन्हाची तीव्र लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. 

Web Title: chandrapur @ 47.6