कोरोना ईफेक्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबाबत झाला हा महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

राज्यात कोरोनाच्या रुग्णांत रोज नव्या संख्येची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. याच अनुषंगाने आता गोंडपिपरी येथील बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊन यासाठी मूल येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आहे. कोरोनाने जिल्ह्यातील पानटपऱ्यांनाही टाळे लावले आहे. यात कोरोनाग्रस्ता संदर्भात समाज माध्यमावर अफवांना ऊत आला आहे. या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

चंद्रपूर : कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या अनुषंगाने मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आदेश जारी केला आहे.

धार्मिक स्थळांमध्ये पुजारी पूजा-अर्चा करू शकतील. मात्र भाविकांना यात प्रवेशबंदी असेल. यापूर्वीच येथील प्रसिद्ध महाकाली यात्रा रद्द केली आहे. मात्र प्रशासनाच्या आवाहनानंतरही भाविकांचे धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे थांबले नव्हते. त्यामुळे आता सर्वधर्मिय धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम असेल तरच टपाल, दूरध्वनी किंवा ई-मेलवरून ते सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांपर्यंत पोचविता येणार आहे. याआधी काल शहरातील पान टप-यांना प्रशासनाने टाळे लावले. शहरातील एकमेव मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद केले आहे. 

गोंडपिपरीची बाजारपेठ बंद, मूलचा आठवडी बाजार रद्द
राज्यात कोरोनाच्या रुग्णांत रोज नव्या संख्येची भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. याच अनुषंगाने आता गोंडपिपरी येथील बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. लोकांचा एकमेकांशी संपर्क येऊन यासाठी मूल येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आहे. कोरोनाने जिल्ह्यातील पानटपऱ्यांनाही टाळे लावले आहे. यात कोरोनाग्रस्ता संदर्भात समाज माध्यमावर अफवांना ऊत आला आहे. या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनान सतर्क आहे. याच श्रृंखलेत आता गोंडपिपरी नगरपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. लोकांचा एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी 31 मार्च बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील "पुकारा' आज शहरात करण्यात आला. रुग्णालयात, औषधी आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला, असे मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी सांगितले. तब्बल पंधरा दिवस बाजारपेठ बंदीच्या निर्णयाने छोट्या व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मूलच्या तहसीलदारांनी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. मूल येथील आठवडी बाजार बुधवारला भरतो. आजवर अपवाद वगळता आठवडी बाजारात खंड पडला नाही. 

निर्लज्ज कुठला! कधी कॉलेजच्या जिममध्ये तर कधी घरी बोलवायचा... शारीरिक शिक्षक

पानटपऱ्यांना टाळे 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने कडक पावल उचलत आहे. यापार्श्‍वभूमीवर गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या पानटपऱ्या बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 लागू झाला आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात जवळपास पाच हजारांवर पानटपऱ्यावर आहेत. याच ठिकाणी सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. त्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur collector decision about temples