निर्लज्ज कुठला! कधी कॉलेजच्या जिममध्ये तर कधी घरी बोलवायचा... शारीरिक शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

शहर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेले महाविद्यालय केवळ मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून ओळखले जाते. तेथे प्राथमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. या महाविद्यालयात विनोद भरडकर हे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भरडकर हे पीटीच्या वेळेत विद्यार्थिनींना चुकीच्या ठिकाणी स्पर्श करतात.

चंद्रपूर : शहरातील नामांकित महिला महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी शारीरिक शिक्षकाविरुद्ध अत्याचार, विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध भादंवि 376, 354 कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

शाळेच्या जीम, घरी बोलावून अतिप्रसंग करणे, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, अश्‍लील संभाषण करणे असे आरोप विद्यार्थिनींनी तक्रारीत केले आहेत. मागील काही वर्षांपासून सुरू असलेला प्रकार विद्यार्थिनींच्या पुढाकारातून उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विनोद भरडकर (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल
शहर पोलिस ठाणे हद्दीत येत असलेले महाविद्यालय केवळ मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून ओळखले जाते. तेथे प्राथमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. या महाविद्यालयात विनोद भरडकर हे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भरडकर हे पीटीच्या वेळेत विद्यार्थिनींना चुकीच्या ठिकाणी स्पर्श करतात. अश्‍लील भाषेत संभाषण करतात. एवढेच नाही, तर एका विद्यार्थिनीला शाळेच्या जीममध्ये, तर कधी घरी बोलावून अतिप्रसंग करीत होते. शिक्षकाकडून वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप होता. मात्र, त्याची कुणाकडे तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे हा प्रकार मागील काही वर्षांपासून सातत्याने सुरू होता.

नागपुरात सामाजिक, राजकीय, धार्मिक सभांना बंदी.... प्रशासनाने दिले हे आदेश

शहरातील नामांकित मुलींच्या महाविद्यालयातील प्रकार
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या शिक्षकाकडून घडणारे कृत्य कमी होत नसल्याने काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार दाखल केली. प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडून सर्व प्रकार ऐकून घेतला आणि महिला तक्रार निवारण कक्षात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस उपनिरीक्षक प्रभा एकुरडे, चंदा दंडवते आणि काही महिला कर्मचाऱ्यांनी साध्या गणवेशात शाळेत जाऊन चौकशी केली. विद्यार्थिनींशी संवाद साधला.

करोनाच्या वादळात नागपूर विद्यापीठाने एक-दोन नव्हे, तब्बल 187 परीक्षा ढककल्या पुढे

विद्यार्थिनींकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींनी तक्रार करावी, पोलिस विभाग पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. 
त्यानंतर बारावीतील एका विद्यार्थिनीने अत्याचार, तर बी. ए. द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भरडकर याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physical education teacher molested students chandrapur