चंद्रपूर : वीज पडून चार महिला ठार; एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश

पाच वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरवात झाली.
lightning
lightning sakal

वरोरा : शेतात काम करीत असताना वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाल्याने काम थांबवून घराकडे निघालेल्या महिलांवर वीज कोसळली. यात चौघींचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील वायगाव भोयर या गावात घडली. मृतांत एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका युवतीचा समावेश आहे.

हिरावती शालीक झाडे (वय ४५), मधुमती सुरेश झाडे (वय २०), पार्वता रमेश झाडे (वय ६५) आणि रिता नामदेव गजबे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. वरोरा तालुक्यातील चिमूर रोडलगत वायगाव भोयर हे गाव आहे. याच गावात पंचायत समितीचे माजी सदस्य शालीक झाडे यांची शेती आहे. काही दिवसांपासून पाऊस ओसरल्याने शेतकामांना वेग आला आहे. शालीक झाडे यांच्या पत्नी हिरावती शालीक झाडे, मधुमती सुरेश झाडे, पार्वता रमेश झाडे आणि रिता नामदेव गजबे या चौघी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतात कामे करण्यासाठी आल्या. दिवसभर त्यांनी काम केले. सायंकाळी थोडे काम शिल्लक होते.

पाच वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरवात झाली. त्यामुळे हिरावती झाडे, मधुमती झाडे, पार्वता झाडे आणि रिता गजबे शेतातील काम सोडून घराकडे जाण्यास निघाल्या. पाऊस जोरदार असल्याने त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली थांबल्या. नेमकी त्याच ठिकाणी वीज कोसळली. यात चौघींचाही मृत्यू झाला. मृत मधुमती सुरेश झाडे ही वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य इंग्रजी माध्यम प्रथम वर्षाला शिकत होती.

पळसाचे झाड ठरले कर्दनकाळ

या महिला शेतीमधील कामासाठी बाहेर पडल्या तेव्हा लख्ख ऊन होते. दुपारी चारनंतर वातावरण अचानक बदलले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. घराकडे परतताना त्या वाटेत पळसाच्या झाडाखाली थांबल्या. आसरा घेतलेले झाड त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com