Chandrapur Weather: चंद्रपुरात मुसळधार; वीज पडून युवकाचा मृत्यू

Heavy Rain Triggers Flood-Like Situation in Chandrapur: चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून वीज कोसळून युवकाचा जीव गेला, अनेक रस्ते बंद झाले आहेत.
Chandrapur Weather

Chandrapur Weather

esakal

Updated on

चंद्रपूरः चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. चिमूर तालुक्यात शेतात जनावरे चराईसाठी गेलेल्या एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. सुहास जयेंद्रथ काळे (वय २०) असे मृताचे नाव आहे. याच तालुक्यातील चकजाटेपार गावात घराची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजुरा तालुक्यातील नोकरी (बु.) माईन्स कॉलनी या मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com