chandrapur hospital
esakal
चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातल डॉ. कुलकर्णी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या पत्नीने एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार (ता. १५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मयुरी विकास पांढरे (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी आहे. पतीच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करू न शकल्याने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.